हुंड्याची मागणी आणि सासरच्यांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून हसनबाग येथील रहिवासी 23 वर्षीय फराह नाझ ने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. दरम्यान फराहच्या कुटुंबीयांनी तिचा पती नोमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर यामागचे सत्य उघड होण्याची शक्यता आहे.