उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन धागा व नायलॉन मांजा विक्री करणे तसेच बाळगणे पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानदार किंवा नागरिकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असून तब्बल २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, असा इशारा दिग्रस पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. आज मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता दिग्रस शहरात पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे फिरत नागरिक व दुकानदारांना याबाबत जाहीर आवाहन केले.