अचलपूर: दुल्हागेट येथे विद्यार्थिनीला मोटारसायकलची धडक; अज्ञात पल्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दुल्हागेट परिसरात १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सायकलवरून घरी जात असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव पल्सर मोटारसायकलने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात विद्यार्थिनीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. फिर्यादी विद्यार्थिनी ही शाळा सुटल्यानंतर अनवरपुरा येथील आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात पल्सर मोटारसायकल चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत तिच्या सायकलला धडक दिली. धडकेमुळे ती खाली पडली व तिच्या पायावर मोटारसायकल आदळल्याने पायाच्या पंज्याजवळ टोंगळ्