नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेली महिला आरोपी लक्ष्मी नीलकमल सुखदेवे हिला पोलिसांनी अटक केली आहे. गस्त घालत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. लक्ष्मी सुखदेवे ही हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून आपल्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला.आरोपी महिलेला पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांच्या आदेशानुसार ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते.