खटाव: पुसेगावनजीक कटगुण गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Khatav, Satara | Oct 7, 2025 सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पुसेगावपासून पूर्व दिशेला कटगुण गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल राजधानीसमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली असून मृत वयोवृद्ध व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात मृत्यू पावलेली व्यक्ती ही अंदाजे ५५ वर्षाची आहे.