औसा: भाविकांच्या गर्दीत कार्तिकी उत्सवऔसा येथे विठ्ठल रुक्मिणीमंदिरात आ.पवार यांचे पिताश्री दत्तात्रय पवाराच्या हस्ते महाआरती
Ausa, Latur | Nov 2, 2025 औसा -कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त औसा शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात धार्मिक वातावरणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीचा मान आमदार अभिमन्यू पवार यांच्या पिताश्री दत्तात्रय पवार यांच्या हस्ते आज दुपारी बारा वाजता पार पडला.प्रभात फेर्यांनी आणि विठ्ठलनामाच्या घोषात सकाळपासूनच मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या महाआरतीनंतर दिवसभर प्रसाद वितरण व कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.