केज: नामेवाडी येथे ट्रॅक्टरचा फॅशन अपघात झाला असून एकाचा मृत्यू तर अन्य जखमी झाले आहेत
Kaij, Beed | Oct 18, 2025 केज तालुक्यातील नामेवाडी येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. नव्यानेच घेतलेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वायबसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकामासाठी कुटुंबीय ट्रॅक्टरने जात असताना अचानक ट्रॅक्टरचा ताबा चालकाच्या हातातून सुटला आणि तो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरखाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांना गंभीर जखमा झाल