आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता बदनापूर शहरातील तालुका क्रीडा संकुलन येथे बदनापूर प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्याचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे, यावेळी तरुणांमध्ये उत्साह पाहता आमदार नारायण कुचे यांनी सुद्धा फलंदाजी करत हे उद्घाटन केले आहे,यावेळी परिसरातील क्रिकेट खेळाडू, क्रिकेट शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.