अकोट: सरस्वती नगर मार्गावरील विद्युत डीपी मधून धुराचे लोट नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;महावितरण घेतली तात्काळ दखल
Akot, Akola | Oct 11, 2025 सरस्वती नगर भाग्यश्री डेअरी समोर दोन ते तीन दिवसापासून विद्युत डी.पी.तुन धुराचे लोट निघत आहे. विशेष म्हणजे यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे तसेच रोज या मार्गावरून शाळेची कॉलेजची मूल येजा करतात. दरम्यान ही बाब आज स्थानिक नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना कळविले असता यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी या बाबीची तात्काळ दखल घेणे सदर डीपीची पाहणी केली.तर महावितरण द्वारा या डीपीची तात्काळ दुरुस्ती काम करण्यात येणार असे देखील सांगण्यात आले,