जावळी: तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेढ्यात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
Jaoli, Satara | Jul 14, 2025 जावली तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन, भुईमुग, घेवडा, ज्वारी या पिकांची पेरणी करण्याची संधीच मिळालेली नाही. ज्या २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची पूर्णपणे नाम झाली आहे. आजअखेर पाउस सुरू असून हंगामी पिकांची पेरणी होऊच शकणार नाही. राज्य शासनाने जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मेढा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.