कळंब: रेती तस्करीच्या वादात इसमाची निर्घृण हत्या, तालुक्यातील चिंचोली येथील घटना
माझ्या रेतीच्या ट्रॅक्टरची तहसीलदाराला खबर का देतो, तसेच मी बनविलेल्या रस्त्यावरून तू वाहतूक का करतो या कारणांवरून एका ४० वर्षीय इसमाची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर बुलेट वाहन देखील मृतकाच्या अंगावर चढवून चिरडले. ही थरारक घटना सोमवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास तालुक्यातील चिचोली येथे बारमध्ये घडली.