श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी २८ डिसेंबर रोजी सुमारे एक लाख भाविकांनी जागृत असलेल्या श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले. यानिमित्ताने मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती. यावेळी 'नाथाच चांगभल' च्या गजराने श्री क्षेत्र बहिरवाडी दुमदुमली होती.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुसऱ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली हीती.