पातुर: शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं! पिक विम्यात फक्त ३, ५, २१ रुपयांची भरपाई; संतापाचा ज्वालामुखी
Patur, Akola | Nov 12, 2025 अकोल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केवळ ३, ५ आणि २१ रुपये इतकी भरपाई जमा झाल्याने संताप उसळला आहे. अतिवृष्टीमुळे 70 ते 75 टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ही थट्टा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. “अरे द्यायचं तर द्या, नाहीतर देऊ नका, पण अशा भीकवजा रकमा देऊन शेतकऱ्यांचा अपमान करू नका,” असा संतप्त स्वर उमटला आहे.