बाबा पेट्रोल पंप परिसरात गांजा पकडला, दोन आरोपीं विरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
आज रविवार 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता क्रांती चौक पोलिसांनी माहिती दिली की, 4 ऑक्टोंबर ला बाबा पेट्रोल पंप परिसरातील ट्रॅव्हल्स पार्किंग मध्ये आरोपी अनिल दंगलसिंग आरीओ, रोहिदास गटरिया ठाकूर दोघे राहणार मध्य प्रदेश या आरोपींकडून आठ किलो 100 ग्रॅम 81 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलिसांनी केली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.