देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठ्ठलवाडी मधील इंद्रायणी नदीकाठी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी करण्यात आली.पोलीस शिपाई श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.