श्रीगोंदा येथे फोटोशूटसाठी गेलेल्या फोटोग्राफर्सना लुटले; शस्त्राने मारहाण करत कॅमेरा आणि रोकड लंपास.. तालुक्यातील वडाळी रोडवरील जंगलात फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात इसमांनी लोखंडी रॉड आणि प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात फोटोग्राफरचा महागडा कॅमेरा सेट आणि खिशातील ३८,००० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहेत.