नगरपरिषदेमधील सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला असून त्यांनी आज रस्त्यावर उतरून भीक मागण्याचे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि नगरपरिषदेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या.“आम्हाला आमचा हक्काचा पगार द्या”, “आम्ही काम करतो, मग आमचं पोट कसं भरायचं?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.