गडचिरोली: सिरोंचा येथील वाळू विक्री शासनाच्या नियमानुसार- खनिकर्म अधिकारीगडचिरोली
'अंकिसा परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ' आणि 'सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस' या शीर्षकांच्या बातम्यांचे खंडन करतांना जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांनी स्पष्ट केले आहे की, सदर वृत्त पूर्णतः अयोग्य, दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन असून, त्याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी कोणताही संबंध नाही.