जळगाव: गोदावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरट्यांनी मारला डल्ला; ११ लाखाची रोकड पोबारा; एमआयडीसी पोलीस दाखल
जळगाव-भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री आस्थापना विभागातील चार कॅबिन फोडून सुमारे ११ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. दरम्यान हा प्रकार विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये कैद झाले असून यामध्ये चार चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे.