पुर्णा: कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या : चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Purna, Parbhani | Oct 22, 2025 पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील 29 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या गेल्याची घटना सोमवारी घडली. पवन सवराते असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पुराच्या पाण्यात शेती पिकांचे नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आत्महत्या केली. प्रकरणी माधव सवराते यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत