किनवट: दरसांगवीत सततच्या नापीकीला व बॅंकेचे पैसे कसे फेडावे या चिंतेतून 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
Kinwat, Nanded | Oct 21, 2025 किनवट तालुक्यातील मौजे दरसांगवी (चि) येथे दि २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १५:२० च्या सुमारास यातील मयत नामे विठ्ठल मारोती सावंत वय 28 वर्ष व्यवसाय शेती यांनी सततच्या नापिकीला व कर्ज कसे फेडावे या चिंतेत कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या करून मरण पावले. याप्रकरणी खबर देणार ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून किनवट पोलीस स्टेशन येथे आज दुपारी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाडगुरे हे आज करीत आहेत.