चांदूर रेल्वे: बसलापूर शेत शिवार येथे रोटारेटर मध्ये अडकून युवकाचा मृत्यू; चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
सुशांत महादेव झाडे राहणार बसलापूर यांनी पोलिसात ट्रॅक्टर क्रमांक MH 27 DU 8936 चा चालक प्रफुल वसंत झाडे राहणार बासलापूर त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगईपनाने चालून मयत पंकज वसंत झाडे याचे रोटावेटर मधील गवत काढताना डोके रोटावेटर मध्ये अडकल्याने जागेवरच मरण पावला .प्रफुल हा त्याचे मरणास कारणीभूत ठरला अशी तक्रार पोलिसात दिली आहे .तेव्हा चालका विरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.