भद्रावती: डा.अनंत मत्ते जळगाव येथे राज्यस्तरीय "समाज भुषण" पुरस्काराने सन्मानित.
सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते डा. अनंत मत्ते यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे वतीने जळगाव येथे राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल डा.मत्ते यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.