जालना: मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाजाच्या वतीने ४१ बटूंची मुंजी उत्साहात संपन्न
Jalna, Jalna | May 3, 2026 जालना : जालना शहरातील पाठक मंगल कार्यालय येथे मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाजाच्या वतीने तब्बल ४१ बटूंच्या मुंजीचा भव्य व धार्मिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील ऐक्य, संस्कार व परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जालना नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राज