अकोला: हिंगणा म्हैसपूर येथे जयराम गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीवर अतिक्रमण कारवाई विरोधा त पोलीस स्टेशनवर मोर्चा
Akola, Akola | Sep 16, 2025 अकोला जिल्ह्यातील हिंगणा म्हैसपूर येथे जयराम गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीवर 12 ऑगस्ट रोजी पहाटे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवत लाखो रुपयांचे नुकसान केले. गाईंचा चारा, पाण्याचा हौद नष्ट करण्यात आला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी गोरक्षणाचे अधिकृत कागदपत्रांसह पुरावे दाखवत कारवाई ही राजकीय दबावाखाली क्रीडा अधिकारी सतीषचंद्र भट यांच्या दुरुपयोगामुळे झाला आहे.