मोहोळ: सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूरजवळ भीषण अपघात, ट्रकला पाठीमागून ट्रकने दिली जोरदार धडक
Mohol, Solapur | Sep 29, 2025 सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूर जवळ ट्रकचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, हा अपघात रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दहा वाजता झाला असल्याची माहिती आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता मिळाली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान समोरील ट्रकला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. या अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.