गोंदिया: जिल्ह्यात जनरल स्टोअर किंवा किराणा दुकानात फटाके विकाल तर होणार कारवाई
Gondiya, Gondia | Oct 13, 2025 यंदा दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. फराळासोबतच फटाक्यांची जोरदार आतषबाजीही पाहायला मिळणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जाणार आहेत. दिवाळीत फटाके विक्री करायची असल्यास त्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे. विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, कर्णकर्कश आवाज करणारे फटाके विक्री करू नये. विनापरवानगी फटाके विकले जात असल्यास त्याविरोधात कारवाई होणार आहे. परवाना घेणाऱ्या लोकांनाच नगर परिषद दुकान लावण्यासाठी जागा उपलब्ध करून स्टॉलची जागा निश्चित करण्याची प