दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान नमस्कार चौक इथे यातील आरोपी माधव पंढरी पंदीलवाड, वय 43 वर्षे, रा.शिवनगर तरोडा नांदेड हा विना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 6080/-रू व जुगाराचे साहित्यासह मिळून आले फिर्यादी पोहेकों गजानन बळीराम कदम, ने. पोस्टे विमानतळ यांनी दिलेल्या फिर्यादवरुन विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी माधव कंदीलवाड विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि/ कानगुले, हे करीत आहेत