जालना: रोड स्वीपिंग मशिन'द्वारे प्रभाग १५ व १४ मध्ये व्यापक स्वच्छता मोहीम जालना महानगरपालिकेचा आधुनिक स्वच्छतेकडे मोठा टप्पा;
Jalna, Jalna | Apr 7, 2026 आज दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला स्वच्छ, सुंदर आणि धूळमुक्त बनवण्याच्या संकल्पातून जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला आहे. दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजल्यापासून प्रभाग क्रमांक १५ (नूतन वसाहत) आणि प्रभाग क्रमांक १४ मध्ये ‘रोड स्वीपिंग मशिन’द्वारे व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि घाण प्रभावीपणे साफ करण्य