जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. अहिल्यानगर वनविभाग व पुण्यातील 'डी.ए.डी.ए. (दा.दा.) रिसर्च फाऊंडेशन' संचलित 'डावेल लाईफसायन्सेस' यांनी संयुक्तपणे 'एआय वाईल्ड नेत्रा' ही स्वदेशी 'इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम' विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेला हा प्रायोगिक तत्वावर कामरगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे