अकोला: गोकुळ कॉलनीत ५ जण चिकनगुनिया पॉझिटिव्ह; मनपा झोपेत, जिल्हा हिवताप विभाग अलर्ट
Akola, Akola | Nov 4, 2025 अकोला : गोकुळ कॉलनी व जवाहर चौक परिसरात चिकनगुनियाचे सावट गडद झाले आहे. सात संशयितांच्या तपासणीत पाच जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार यांनी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता सांगितले की सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम सुरू आहे. परिसरात साचलेले पाणी व घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढल्याची तक्रार रहिवासी सतीश देशमुख यांनी केली. नागरिकांनी ‘कोरडा दिवस’ पाळावा, पाणी साचू देऊ नये, असे आवाहन डॉ. शंकरवार यांनी केले असून मनपा आरोग्य विभागाच्या धीम्या प्रतिसादावर नाग