राळेगाव: तहसीलदार अमित भोईटे यांनी तालुक्यातील सोनुर्ली वेडशी पळसकुंड कळमनेर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिल्या भेटी
राळेगाव तहसीलदार अमित भोईटे यांनी आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी तीन वाजता तालुक्यातील सोनुर्ली येथील पांडुरंग घुगुस्कार, वेडशी येथील उमेश उताणे, पळसकुंड येथील सुरज घोसले तसेच कळमनेर येथील किशोर वैरागडे या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांमध्ये लाभ देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.