नागपूर शहर: रमाबाई नगर परिसरारून हेरॉईन तस्कराला अटक
29 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने रमाबाई नगर परिसरात सापळा रचून रकीब अहमद मलीक याला अटक केली. त्याच्याकडून १२ ग्रॅम हेरॉईन, मोबाईल व मोपेडसह एकूण १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . चौकशीत कय्यूम अहमद मलीक या साथीदाराचा सहभाग उघड झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.