जालना: बाजीउमृद तांड्यात ढोंगी महाराजांचा कथित प्रकार; महिलेचे दागिने गायब, संतप्त ग्रामस्थांकडून चोप
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना तालुक्यातील बाजीउमृद तांडा येथे ढोंगी महाराजांच्या नावाखाली फसवणुकीचा कथित प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवार दि. 1 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेच्या कानातील सोन्याचे सेवन पीस व झुंबर जोड गायब झाल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांनी स्वतःला महाराज असल्याचे सांगत गावात प्रवेश केला होता. या दरम्यान एका महिलेच्या कानातील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी भोंदूला चोप दिला.