खामगाव: रोहित पगारिया यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव अन्यायकारक सकल - हिंदू समाज
उपविभागीय अधिकारी डॉ पुरी यांना दिले निवेदन
गोरक्षण, हिंदू धर्मप्रसार आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले रोहित पगारिया यांच्याविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत, सकल हिंदू समाज आणि विविध धार्मिक-सामाजिक संघटनांच्या वतीने या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.