जालना: जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिन्नू पी. एम. यांच्या कार्यपद्धतीविरोधात कर्मचार्यांचा संताप; काम बंद करण्याचा इशारा
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालना जिल्हा परिषदेच्या प्रशासनात गेल्या काही महिन्यांत आमूलाग्र बदल घडवून आणणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्याविरोधात कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाले आणि कर्मचार्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.