पोंभूर्णा: आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी पोंभुर्णा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन
आदिवासी व बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेच्या वतीने शुक्रवारी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवई, भटारी, केमारा या गावांना वनग्राममधून वगळणे, आदिवासींना वनहक्क दावे मंजूर करणे आणि तालुक्यातील गावांना पेसा गाव म्हणून जाहीर करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.