जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष खरेदीवेळी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्केटिंग फेडरेशनकडील खरेदी केंद्रे सुसज्ज असून खरेदीही वेगात सुरू आहे. मात्र एफपीओ म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे खरेदीचे प्रमाण अधिक, सुविधा मुबलक असूनही शासनाकडून बारदाना न मिळाल्याने या केंद्रांवरील खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. लवकर सुरू करा अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा सत्तार पटेल यांनी दिला.