तेल्हारा: तेल्हारा-खापरखेडा मार्गावर भीषण अपघात; एक ठार, दहा ते बारा जखमी
Telhara, Akola | Oct 19, 2025 तेल्हारा-खापरखेडा मार्गावर आज सायंकाळी पाच वाजता भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ऍपे आणि कारमध्ये हा अपघात झाला. ऍपे वाहनात एकूण दहा जण प्रवास करत होते. यापैकी दीपक दुबे यांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. तर शेख शाहिद, विशाखा गवारगुरु, संजीवनी दामोदर, सविता भटकर, राजपाल भटकर, उषाबाई वानखडे, वासुदेव गवारगुरु, मोहम्मद शहा रहीम शहा आणि देवेंद्र दुबे असे जखमींची नावे आहेत.