साकोलीत नागझिरा रोडवरील अंजली डोळ्यांच्या दवाखाना येथे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉ.प्रवीण तोगडिया यांचे मार्गदर्शन
जमनापुर येथील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रवीण भाई तोगडिया यांनी मार्गदर्शन केले श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक तथा आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक सदस्य व हिंदू हृदय सम्राट प्रविनजी यांनी यावेळी हिंदूंनी संघटित राहावे असे आवाहन केले बटोगे तो कटोगे असा नारा देत हिंदूंनी जाती जातीत विभाजन न करता आपण हिंदू एक आहोत या भावनेने एकमेकांना सहकार्य करत हिंदूंनी स्वतःचा उद्धार करावा असे आवाहन केले या कार्यक्रमाचे आयोजन नेत्रचिकित्सक ओमेंद्रजी येडे यांनी केले होते