महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय साकोली व खैरलांजीतर्फे साकोली शहरामध्ये भव्य आध्यात्मिक रॅली शोभायात्रा व शिव ध्वज मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले शनिवार दि.14 फेब्रुवारीला आयोजित रॅलीद्वारे समाजात आत्मिक जागृती शांतता व नैतिक मूल्यांचा संदेश देण्यात आला यात अनेक भाविक तसेच ब्रह्मकुमारी व ब्रह्मकुमार यांनी सहभाग घेतला साकोली येथील बिके संगीता दीदी, देवरीच्या बीके स्मिता दिदी, बीके स्नेहा दीदी यांच्या मार्गदर्शनात रॅलीच्या आयोजन करण्यात आले