परभणी: अन्न व औषध प्रशासन कार्यालयात चोरी ; 4 लाख 78 हजारांचा मुद्देमाल लंपास नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अज्ञात चोरट्याने चोरी करत सीसीटिव्हीचे डिव्हिआर, शासनाकडून प्राप्त झालेले सॉफ्टवेअर यंत्र असा एकूण ४ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना ३१ ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग सहाय्यक आयुक्त अनंतकुमार चौधरी यांनी तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.