जिल्ह्यातील पंचायत समिती वरोरा येथे वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई निधी वाटप संदर्भात आढावा बैठक आज दि 30 ऑक्टोबर 4 वाजता आ. करण देवतळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन, भरपाई वितरणाची प्रक्रिया आणि प्रशासनाच्या पुढील कार्ययोजनेवर चर्चा करण्यात आली.