चिखलदरा: पो.स्टे.हद्दीत अल्पवयीन मुलीशी लग्न करून वारंवार बलात्कार;गर्भपातानंतर आरोपीवर चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल
चिखलदरा पो.स्टे.हद्दीत अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना चिखलदरा पो.स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती.अखेर २५ सप्टेंबर रोजी तिचा गर्भपात झाल्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला.या प्रकरणी पो.उप.नि. शुभागी ठाकरे यांच्यातर्फे चिखलदरा पोलीस ठाण्यात दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी १:१८ मिनिटांनी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुनील कुंजीलाल बारस्कर रा.बानूर, मध्यप्रदेश व आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.