भंडारा जिल्ह्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाच्या अनपेक्षित दर्शनामुळे स्थानिकांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास मार्गाने जात असलेल्या चारचाकी वाहनचालकांना अचानक रस्त्याच्या मध्यभागी पट्टेदार वाघ दिसला. वाहनचालकाने तत्काळ वाहन थांबवत शांततेने परिस्थिती हाताळली आणि मोबाईलमधून वाघाचा थरारक व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्यानंतर काही तासांतच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 28 नोव्हेंबर रोजी सायं. 7 वाजताच्या