पवनी पोलिसांनी मौजा सावरला येथे दि. ०९/१२/२०२५ च्या मध्यरात्री १ वाजता दरम्यान पेट्रोलिंग दरम्यान एम.एच.४०/सीएम ००७२ क्रमांकाचा १६ चाकी टिप्पर विना-परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना पकडला. शुभदा धुर्वे (तहसील कार्यालय, पवनी) यांनी ही कारवाई करून तहसीलदारांना माहिती दिली. नायब तहसीलदार यांच्या पंचनाम्यानंतर टिप्पर चालक व मालकावर पो.स्टे. पवनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.ह.वा. फळणीकर करत आहेत.