वडवणी: डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोनद्वारे संवाद साधून कुटुंबीयांना धीर दिला
Wadwani, Beed | Oct 29, 2025 फलटण येथे घडलेल्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांकडून या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे राहणाऱ्या मुंडे कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात आपणही सहभागी असल्याचे