अकोला: शाळा बंदीच्या आदेशालाशिक्षण बचाव समन्वय समितीचा विरोध जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन
Akola, Akola | Oct 17, 2025 पटसंख्येच्या आधारावर अकोला जिल्ह्यातील 25 शाळा बंद करण्याच्या शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या आदेशाला शिक्षण बचाव समन्वय समितीने तीव्र विरोध केला आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायदा 2009 व राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे नमूद करत हा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न असून