खालापूर: खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी माझे आत्मीयतेने स्वागत केले, या बैठकीदरम्यान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या, स्थानिक राजकीय समीकरणे या संदर्भात सखोल चर्चा केली. तसेच पक्षाची ध्येय-धोरणे, निवडणूक रणनीती आणि प्रचार या संदर्भात मार्गदर्शन केले. ही निवडणूक पक्षाच्या बळकटीकरणाची लढाई आहे. याप्रसंगी खोपोली परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उबाठा व शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.