पातुर: जय बजरंग विद्यालय स्काऊटचा उटणे विक्री उपक्रम : लहानग्यां सोबत दिवाळी साजरी
Patur, Akola | Oct 16, 2025 जय बजरंग विद्यालय स्काऊटचा उटणे विक्री उपक्रम : लहानग्यां सोबत दिवाळी साजरी मळसूर : जय बजरंग विद्यालय, चान्नीच्या स्काऊट-गाईड विभागाने उटणे विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी केली. या उपक्रमात स्काऊट शिक्षक वसंत ढोकणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख अतिथी ठाणेदार रवींद्र लांडे यांनी सायबर क्राईमबाबत जागरूकतेचे आवाहन केले. सर्वाधिक उटणे विक्री करणाऱ्या संकेत ताले व अभिग्यान सरदार यांचा सत्कार झाला.